4sunil_20kedar_1.jpg
4sunil_20kedar_1.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

केंद्र सरकार शेतकरी विरोधीच...

सुरेंद्र रामटेके

वर्धा : "सामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर यांना भूलथापा देत आणि स्वतःला शेतकऱ्याच्या बाजूचे म्हणून सत्ता स्थापन केलेले केंद्र सरकार हेच खरे शेतकरी विरोधक आहेत," असा आरोप महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केला.

नुकत्याच मंजुर झालेल्या शेतकरी कायद्याच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात राज्यात आयोजित व्हर्चुअल रॅलीत केदार यांनी हा आरोप केला. संपूर्ण देशात ज्या शेतकरी विरोधी कायद्याचा निषेध होत असतांना केंद्र सरकार मात्र अजूनही गप्प आहे. त्यांना शेतकऱ्यांचा अश्रूंशी काहीही घेणे नाही, असे सुनील केदार म्हणाले. एकीकडे शेतकऱ्यांचे पालनहर म्हणून सत्ता हस्तगत करायची आणि नंतर मात्र त्याच शेतकऱ्यांना देशोधडीला लावायचे असा मूलमंत्र केंद्र सरकार सध्या अवलंबवत आहे. 

कोरोना या जागतिक महामारीमुळे जेव्हा संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था कोलमडली होती, त्या वेळी महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी सुद्धा हतबल झाला होता. परंतु महाविकास आघाडी सरकारने त्या संपूर्ण शेतकऱ्यांना दिलासा देत टाळेबंदीच्या काळात सरकारी दराने संपूर्ण दूध खरेदी करण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडीने नेहमी शेतकरी हिताचे निर्णय घेतले आहे. 

शेतकरी व कामगारांच्या विरोधातील या निर्णयाला आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी तर्फे संपुर्ण राज्यात विरोध करण्यात आला. येत्या काळात हे शेतकरी विरोधी कायदे जर केंद्र सरकारने रद्द केले नाही, तर काँग्रेस पक्षातर्फे सर्व देशात रस्त्यावर उतरून आंदोलनाची भूमिका घेतली जाईल, असे वक्तव्य सुद्धा मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केले.

हेही वाचा : राहुल कुल सहा वर्षांनंतर भेटले अजित पवारांना 
 केडगाव (जि. पुणे) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार राहुल कुल यांच्यात आज (ता. 15 ऑक्‍टोबर) मंत्रालयात झालेल्या बैठकीची तालुक्‍याला उत्सुकता आहे. तालुक्‍यातील कामाच्या निमित्ताने सुमारे सहा वर्षांनंतर (फडणवीस यांच्याबरोबर झालेल्या शपथविधीवेळी स्वागत भेट झाली होती) झालेली भेट ही चर्चेचा विषय झाली आहे. दरम्यान, कुल यांनी मागणी केलेले बहुतांश विषय अजित पवार यांनी मार्गी लावल्याने कुल यांनी समाधान व्यक्त केले आहे. कुल यांनी तोंडी सांगितलेले विषयांवर सुद्धा अजित पवार यांनी सकारात्मक निर्णय घेतले आहेत. 

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT